Sun. Aug 18th, 2019

इन्स्टाग्रामचा नवा लूक लवकरचं तुमच्या भेटीला

0Shares

सोशल मीडियावर कमी वेळातच फोटोंच्या दुनियेतून लोकप्रिय झालेले इन्स्टाग्राम अॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. येत्या काही दिवसात युजर्सना इन्स्टाग्राममध्ये काही नवीन बदल पाहायला मिळणार आहेत. इन्स्टाग्राममध्ये प्रोफाइल, फीचर, आयकॉन्स आणि बटण अधिक आकर्षक करण्यात येणार आहे. या संदर्भात चाचणी सुरू असल्याची माहिती देण्यात आली असून या नव्या फिचर्सच्या मदतीने युजर्स आपल्या मित्रमैत्रिणींसोबत सोप्या पद्धतीने कनेक्ट होणार आहेत.

इन्स्टाग्राम युजर्सच्या प्रोफाईल कंटेंटमध्ये कोणातही बदल होणार नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. मात्र नवीन फीचर अॅड झाल्यानंतर फॉलो आणि मेसेजचं बटण बाजूबाजूला येणार आहे. तसेच आपण जेव्हा कोणाच्याही प्रोफाइलवर टॅप करू तेव्हा आपल्याला म्यूच्युअल फॉलोअर्स दिसणार आहेत. युजर्संना इन्स्टाग्रामचा वापर करणे अधिक सोयीचे व्हावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

इन्स्टाग्राम री-डिझाईनमध्ये काही खास बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये फॉलोअर्स काऊंट आधीच्या तुलनेत वेगळ्या पद्धतीने दिसणार आहेत. इन्स्टाग्रामने गेल्या आठवड्यात युजर्स अॅपवर किती वेळ घालवतात हे सांगणारे नवे फीचर आणले होते. तसेच कंपनीने फेक फॉलोअर्स आणि स्पॅमर्सला रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इन्स्टाग्रामसह ट्वीटरनेही काही दिवसांपूर्वी आपल्या iOS अॅपमध्ये अशाच प्रकारचे बदल केले आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *