Thu. May 13th, 2021

राजभवनातून होणार हंगामी अध्यक्षाची निवड

मुंबई-सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घ्या, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ 30 तासांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर खुलं मतदान घ्या. या निकालाचं थेट प्रक्षेपण करा, असे न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलेलं आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घ्या, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे.

बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर खुलं मतदान घ्या. या निकालाचं थेट प्रक्षेपण करावे, असे न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलेलं आहे. बहुमत चाचणी घेण्यापुर्वी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांची निवड करावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.

बहुमत चाचणी ही हंगामी अध्यक्षांच्या अधिकारक्षेत्राखाली होणार असून, मंत्रालयाकडे हंगामी अध्यक्षांसाठी 17 नावांची शिफारस करण्यात आलेली आहे.

या यादीतून निवडणार हंगामी अध्यक्ष

1. बाळासाहेब थोरात – काँग्रेस 

2. दिलीप वळसे पाटील – राष्ट्रवादी

3. बबनराव पाचपुते – भाजपा

4. जयंत पाटील – राष्ट्रवादी

5. हरिभाऊ बागडे – भाजपा

6. कालिदास कोळंबकर – भाजपा

7. जयंत पाटील – शेकाप 

8. राधाकृष्ण विखे – भाजपा

9. गिरीश महाजन – भाजपा

10. छगन भुजबळ – राष्ट्रवादी 

11. के सी पाडवी – काँग्रेस 

12.  विजयकुमार गावित – भाजपा

13. सुधीर मुनगंटीवार – भाजपा

14. हितेंद्र ठाकूर – बंविआ

15. बबनराव शिंदे – राष्ट्रवादी 

16. मंगलप्रभात लोढा – भाजपा 

17. प्रकाश भारसाकळे – भाजपा

यांचा नावांची शिफारस करण्यात आली असून, राज्यपाल यातीलच एकाची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करु शकतात. दरम्यान गत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे नाव हंगामी अध्यक्ष म्हणून चर्चेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *