Fri. Jun 21st, 2019

Hug Day – दिवस ‘जादू की झप्पी’चा!

15Shares

Valentine Week मधील आजचा सहावा दिवस. Hug Day म्हणजेच आलिंगन दिवस. आपल्या प्रिय व्यक्तीला आलिंगन देण्यासाठी एखाद्या खास दिवसाची वाट पाहणं गरजेचं नसतं. तरीही या दिवशी आलिंगनातून आपल्या भावना सहज व्यक्त करता येतात. आलिंगन ही केवळ एक कृती नसून ती एक भावना असते. भावना व्यक्त करण्याची एक अशी पद्धत आहे, जी नातं सुदृढ करते…

मिठी मारण्याचा आनंद काय असतो, हे सांगण्याची गरज नाही. जे शब्दांत सांगता येत नाही, ते एका मिठीतून लगेच समजतं. आई, भाऊ, बहिण, मित्र, मैत्रिण, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असे कोणालाही आलिंगन देऊन भावना व्यक्त करता येते.

पाहूया मिठीचे फायदे:

आजारांना ठेवा दूर-

साधारण 400 लोकांवर करण्यात आलेल्या चाचणीनुसार आलिंगन दिल्याने व्यक्तीला आजारांचा धोका कमी असतो.
जे लोक Partner सोबत असतात ते कमी आजारी पडतात.

हृदयासाठी लाभदायक-

मिठी मारल्यामुळे शरीरातील लव्ह् हार्मोन्सच ऑक्सीटोसिनचं प्रमाण वाढतं.त्यामुळे रक्तप्रवाह चांगला होऊन ह्रदयही निरागी राहतं.


ब्लडप्रेशर पासून सुटका-

मिठी मारल्यानं ब्लडप्रेशर ही कमी होतं. ऑक्सीटोसिन हार्मोन्सच्या नुसार,जे लोक नेहमी Partnerला आलिंगन देतात, त्यांच ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहतं.

मनःशांती मिळते-

जर तुम्हांला तणाव जाणवत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल, तर आपल्या Partnerला एक छान मिठी मारा. असं केल्यानं तुम्हांला आपलेपणाची जाणीव होईल आणि आनंदमय वातावरण होऊन मनाला शांती मिळेल.

पॉझिटिव्ह एनर्जी वाढते-

रिलेशनमध्ये खूपवेळा असे होते की, एकमेकांना काहीही न सांगता मनातील गोष्टी आपोआप समजतात. यावेळी एक सुंदर
मिठी दिल्यानं पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होतो आणि आत्मविश्वास वाढतो.

15Shares

Leave a Reply

%d bloggers like this: