तहसील कार्यालयाच्या आवारातील 70 फूट खोल विहिरीत यांनी का बसवलंय बस्तान?

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरातील तहसील कार्यलयाच्या आवारात असलेल्या 70 फुट खोल विहरीत मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी दोन नागरिकांनी आमरण उपोषण सुरु केलंय. या घटनेने नगरप्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे..

नागरिकांनी मंगळवारी रात्री 2 वाजता विहिरत उतरुन उपोषणाला सुरुवात केली. वार्ड क्रमांक 7 मधील विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार आहे, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय.

काय आहेत या उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या?

तहसील शासकीय निवासस्थानाचं सांडपाणी सरळ वस्तीमध्ये येतं. त्याचा नागरिकांना नाहक त्रास होतो. याकरिता नाले बांधकाम करावं.

वॉर्ड क्रमांक 7 मध्ये नाल्यांचे काम अपूर्ण सर्वत्र अस्वच्छता आहे.

वॉर्डमध्ये अजिबात रस्ताच नाही. त्यामुळे तात्काळ रस्ते तयार करणे

‘माता रमाई घरकुल योजने’चे पैसे थकीत आहेत. ते पैसे लवकर मिळावे.

या सर्व मागण्यांचं निवेदन सर्व शासकीय स्तरावर वारंवार देऊन ही मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून 70 फुट खोल विहिरीत बसून वार्ड मधील नागरिकांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. जो पर्यंत या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत उपोषण सुरुच ठेवणार असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय.

Exit mobile version