Sat. May 25th, 2019

पत्नीला परीक्षेला प्रवेश नाकारला, धक्क्यामुळे पतीचा heart attack ने मृत्यू!

635Shares

नांदेडमध्ये केंद्रप्रमुखाने पत्नीला परीक्षा देऊ दिली नाही म्हणून ताण सहन न झाल्याने एका तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील होराईझन स्कूल येथे हा धक्कादायक प्रकार घडलाय.

नोकरीसाठी इतकी अस्वस्थता?

एका जागेसाठी हजारो लाखो अर्ज येत आहेत.

शिक्षणानंतरही नोकरी मिळत नसल्याने तरुण हताश होत आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथील 32 वर्षीय गजानन देशमुख याचा अशाच विवंचनेमुळे बळी गेलाय.

पत्नीची कृषी सहाय्यक पदाची ऑनलाईन परीक्षा असल्याने नांदेडच्या होरायझन स्कूलच्या परीक्षाकेंद्रावर दोघे सकाळी आले.

मात्र, परीक्षेला नियोजित वेळेत न आल्याने केंद्रप्रमुखाने गजाननच्या पत्नीला परीक्षेस प्रवेश नाकारला.

त्यामुळे ताण आल्याने गजाननला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.

गजाननच्या मृत्यूस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी नातेवाईकांनी मृतदेह केंद्रावर ठेवला.

परिसरात तणावाचं वातावरण तयार झालं होतं.

पोलिसांनी हस्तक्षेप करुन तणाव निवळण्याचा प्रयत्न केला.

मात्र, गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतलीय.

मृत गजानन देशमुख याचे शवविच्छेदन करुन रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.

 

काय होतं गजानन देशमुख यांचं स्वप्न?

वाढत्या बेरोजगारी मुळे अनेकजण आत्महत्या करत आहेत किंवा नैराश्याच्या गर्तेत जात आहे.

गजानन देशमुखचं स्वतःचं शिक्षण कमी होतं.

पत्नीचं शिक्षण चांगलं झालं म्हणून कृषी सहाय्यकपदाच्या परिक्षेसाठी तो पत्नीला घेऊन नांदेडला आला.

मात्र, पाच मिनिटं उशिर झाल्याने पत्नीला प्रवेश नाकारल्याने ताण येऊन गजानन देशमुखचा मृत्यू झाला.

गजानन देशमुख हा अल्प भूधारक शेतकरी कुटुंबातील होता.

त्याला दोन मुले आई आणि पत्नी असा परिवार होता.

पूर्ण कुटुंब चालवणारा तोच होता.

 

गजानन देशमुखच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांकडून केली गेली. मात्र पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत. पोलिसांनी मात्र या प्रकरणात तपास करुन गुन्हा दाखल करू अशी भूमिका घेतलीय.

दरम्यान, आज लाखो  बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत मात्र,शासनाच्या ठेकेदाराने थोडी जरी माणूस की दाखवून गजानन देशमुख च्या पत्नीला परिक्षा देऊ दिली असती तर आज त्याचा मृत्यू झाला नसता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *