Fri. Dec 3rd, 2021

बीडमध्ये गळा चिरून डोळे फोडून, ओठ तोडून पतीने केली पत्नीची हत्या

ओठ तोडून डावा डोळा फोडून आणि गळा चिरून पतीने केली पत्नीची हत्या केली

बीडमधील परळी या तालुक्यातील सिरसाळा अनुसया पेट्रोल पंपच्या परिसरात धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. आरोपी सिराज पठाण (वय 30)हा शेतीमध्ये आणि विट मजुरी काम करतो.

मयत महिलेचे नाव नेहा (वय 25) असं आहे. काही कारणामुळे सिराज हा कामावरून 3 वाजता घरी परत आला. किरकोळ कारणातून सिराजने नेहाला मारहाण करणं सुरू केलं. सिराजने नेहाचे ओठ तोडले डावा डोळा फोडला आणि गळा चिरून नेहाची हत्या केली.

त्यानंतर या घटनेला आत्महत्या असल्याचं सिराजने पोलिसांना सांगितले. पोलिसांच्या चौकीशी नंतर सिराजने त्यांचा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही हत्या घरगुती वादातून झाली असावी असा अंदाज पोलिसांनी लावला. यानंतर पोलिसांनी निर्दयी पतीला अटक केली .

नेमक घडलं काय ?

बीडमधील परळी या तालुक्यातील सिरसाळा अनुसया पेट्रोल पंपच्या परिसरात धक्कादायक प्रकरण घरगुती वादातून पतीने केली पत्नीचा हत्या

ओठ तोडून डावा डोळा फोडून आणि गळा चिरून पतीने केली पत्नीची हत्या केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *