Thu. Dec 2nd, 2021

पत्नीचे अपघाती निधन, त्या नैराश्यातून पतीची आत्महत्या

राज्यात आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आणखी एका आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. मराठवाड्यातील आत्महत्येची घटना समोर आली आहे.

अपघातात पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील गंगाखेड़ तालुक्यात घडली आहे.

विशेष म्हणजे गळफास लावण्यापूर्वी पतीने आपल्या पत्नीला उद्देशुन आपल्या व्हाट्सअपवर स्टेटस सुद्धा ठेवले होते.

मी तुला भेटण्यासाठी येत आहे, माझ्या मरणाला कोणी ही जबाबदार नाही. आई-बाबा मी जातोय, मित्रांनो,आज मी तुम्हांला सोडून जातोय, अशा भावनात्मक पोस्ट लिहून त्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

सार्थक बचाटे अस मृताचं नाव आहे. सार्थक बचाटे यांचा 11 फेब्रुवारीला गंगाखेड-परळी रोडवर अपघात झाला होता. या अपघातात सार्थक यांची पत्नी चंदा यांचा मृत्यू झाला होता.

पत्नीच्या मृत्युनंतर सार्थक हा नैराश्यात होता. व्हाट्सअपच्या स्टेटस पाहून नातेवाइकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, तो घराच्या पाठीमागील एका शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

दरम्यान या घटनेने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुनेनंतर मुलाच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *