पतीची विकृती! पत्नीलाच आपल्या मित्रांशी करायला लावायचा सेक्स

दारूच्या नशेमुळे संसार बरबाद करणाऱ्या लोकांच्या अनेक कहाण्या तुम्ही पाहिल्या असतील. मात्र बेंगळुरूमध्ये घडलेली एक हकीगत मात्र अंगावर काटा आणणारी आहे. दारूसाठी आपल्या पत्नीलाच विकायला काढल्याची घृणास्पद घटना शहरातील मालावली येथे घडली आहे. पतीचा हा विकृतपणा सहन न होऊन अखेर त्याच्या 26 वर्षीय पत्नीने आत्महत्या केली.
सुसाईड नोटमधून अनेक भीषण घटनांचा खुलासा-
आत्महत्या केलेल्या महिलिने लिहिलेल्या तीन पानी सुसाईड नोटमधून अनेक भीषण घटनांचा खुलासा झाला.
6 वर्षांपूर्वी महिलेचा राजू नामक आरोपीशी विवाह झाला होता.
लग्नानंतर राजू वारंवार दारूच्या नशेतच पडून राहत असे. तसंच दारूसाठी पत्नीकडे सतत पैसे मागत असे.
पत्नीने अखेर पैसे देणं बंद केल्यामुळे राजू मित्रांकडे पैसे मागू लागला.
दारूच्या संपूर्ण आहारी गेलेल्या राजूने पैशांसाठी आपल्या पत्नीलाच मित्रांसोबत सेक्स करण्यास भाग पाडलं.
तो अनेकदा मित्रांना घरी बोलावायचा आणि आपल्याच दिवाणखान्यात या मित्रांसोबत सेक्स करण्यासाठी पत्नीवर जबरदस्ती करायचा.
संतापजनक गोष्ट म्हणजे आरोपीची आई आणि बहीणदेखील यामध्ये सामील असायचे. या गोष्टीला नकार देणाऱ्या पत्नीला पती, सासू आणि नणंद मारहाण करत असत.
अनेकवेळा मयत पत्नीला पतीने आणलेल्या लोकांसोबत शरीरसंबंध ठेवावे लागत. राजू या बदल्यात मित्रांकडून दारू पिण्यासाठी पैसे मागत असे.
पतीच्या या विकृतीला कंटाळून पत्नी आपल्या मुलांबरोबर घर सोडून गेली. मात्र राजूने तिथेदेखील तिचा पिच्छा पुरवला आणि तिच्यावर आपल्या मित्रांसोबत सेक्स करण्याची जबरदस्ती करू लागला.
अखेर पतीच्या या वागण्यामुळे पत्नीने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत तिने आपल्यासोबर घडणाऱ्या भीषण कृत्यांची माहिती लिहिली होती. सुब्रमण्यिमनगर पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा नोंदवला आहे. मात्र पती, सासू आणि नणंद हे तिन्ही आरोपी फरार झाले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.