Mon. Jul 22nd, 2019

चोरीला गेली प्रेमाची निशाणी; एकाकी पतीची करूण कहाणी

0Shares

राज्यात चोऱ्या करणाऱ्या टोळ्या सक्रिया झाल्या असून कोल्हापुरातही आठवड्याभरात 20 हून अधिक घरफोड्या झाल्या आहेत. घरफोडीमुळे अनेकांचे मौल्यवान वस्तू चोरीला जातात. मात्र कोल्हापुरातील एका घरातून चक्क पत्नीने दिलेले किंमती भेटवस्तू चोरीला गेल्यामुळे पती हवालदिल झाला आहे. चोरट्यांनी किंमती भेटवस्तू चोरी केल्यामुळे पतीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

कोल्हापूरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून आठवड्याभरात 20 हून अधिक घरफोड्या झाल्याचे समजते आहे.

अशाच एका घरफोडमध्ये चोरट्यांनी पत्नीला दिलेल्या किमंती भेटवस्तूची चोरी केली आहे.

भेटवस्तूसह चोरट्यांनी दोघांनी लिहिलेले प्रेमपत्रही फाडून टाकले आहे.

या चोरीमुळे पती हवालदिल झाला असून त्याने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

मनोजकुमार श्रीवास्तव असं या पतीचे नाव आहे.

काही वर्षांपूर्वी मनोजकुमार यांच्या पत्नीचा आजारामुळे निधन झाले होते.

तसेच त्यांची मुलं लहान असल्यामुळे मनोजकुमार यांनी दुसरे लग्न केले नाही.

या वस्तूंच्या आधारे ते जगत असल्याचे मनोजकुमार यांनी सांगितले आहे.

आपल्या प्रेमाची निशाणी मिळावी म्हणून मनोजकुमार यांनी चोरट्यांना भावनिक आवाहन केले आहे.

चोरट्यांना हवे तेवढे पैसे देईन. मात्र वस्तू परत करा असे आवाहन मनोजकुमार यांनी केले आहे.

मनोजकुमार यांना चोरी केलेल्या प्रेमाची निशाणी पोलीस शोधून देतील का ? असा प्रश्न त्यांना उपस्थित झाला आहे.

 

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: