चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची झोपेत हत्या!

मिरजेत पत्नीच्या चारित्र्याचा संशयावरून पतीने चाकूने भोसकून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पती फरार झाला आहे.
काय आहे हे प्रकरण?
रेल्वे स्टेशननजीकच्या प्रताप कॉलनी येते राहणाऱ्या सोनम माने या 18 वर्षीय तरुणीची हत्या झाली.
पती राहुल अशोक माने यानेच ती झोपलेली अवस्थेत असताना पत्नीचा चाकूने भोकसून खून केला.
ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
राहुल माने याने एक वर्षापूर्वी मावशीची मुलगी सोनमशी प्रेमविवाह केला होता.
या लग्नानंतर राहुल हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.
त्यामुळे त्याच्यात वारंवार वाद होत होता.
मध्यरात्री राहुल याने झोपलेल्या सोनम हिच्या पोटात चाकू भोकसल्याने सोनम हिने आरडाओरडा केला.
शेजारी राहणाऱ्या तरुणांनी राहुल माने याला पकडण्याचा प्रयत्न केला पण राहुल माने पळून जाण्याचा यशस्वी झाला.
या झटापटीत राजू अच्युधन या तरुणाचा हाताला चाकू लागल्याने जखमी झाला आहे.
यावेळी पोटात चाकूने वार झाल्याने गंभीर जखमी झालेल्या सोनमला मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं.
उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. राहुल माने याने चारित्र्याच्या संशयावरून बहिणीचा खून केल्याचे मिना शेख हिने सांगितले आहे. राहुल माने याला तात्काळ अटक करून न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.