Wed. Aug 4th, 2021

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा चिरून हत्या

विरार मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची गळा चिरून हत्या करून पोलिसांत जाऊन आत्मार्पण केले. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलं पुढील तपास करत आहेत.

विरार पूर्वेच्या भोईर पाडा परिसरात बाळकृष्ण सोसायटीत राहणाऱ्या 62 वर्षीय किशोर फुटणे याने रविवारी सकाळी आपाल्या पत्नीची घरात हत्त्या केली. त्यानंतर स्वत: चालत जाऊन विरार पोलीस ठाण्यात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

काय आहे प्रकरण?

विरार पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार किशोर फुटणे हा रिक्षाचालक होता.

किशोर त्याची 49 वर्षीय पत्नी शुभा आणि मुलासह राहत होता.

शुभा आणि किशोर यांच्यात मागील काही वर्षापासून वाद सुरू होता.

रविवारी सकाळी किशोर नेहमीप्रमाणे रिक्षा चालवण्यास गेला असता तो आपला मोबाईल घरी विसरला होता.

दोन तीन प्रवाश्यांना सोडून झाल्यानंतर तो परत घरी आला.

तेव्हा त्याला घरात कोणीतरी आल्याचा संशय आला.

यावरून त्याचं पत्नीशी जोरदार भांडण झालं.

भांडण इतकं विकोपाला गेलं की त्याने घरातील विळी आणि वरवंट्याने शुभावर हल्ला केला आणि त्यात शुभाचे प्राण गेले.

त्यानंतर किशोर रक्ताने माखलेल्या अवस्थेत घराबाहेर आला आणि चालत जाऊन त्याने पोलिसांकडे गुन्हा कबूल केला.

किशोर घरातून जाताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झालाय.

पोलिसांनी किशोरला ताब्यात घेऊन चौकशी सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *