Thu. Jul 9th, 2020

25 वर्षांनी लहान दिराशी वहिनीचं प्रेमप्रकरण, दोघांनाही पडलं महागात!

25 वर्षाने लहान असलेल्या आपल्या दीरासोबत या महिलेचे प्रेमसंबध जुळले होते.

वहिनीचं दिराशी प्रेम प्रकरण असल्याचं समजल्यामुळेबिहारमधील गयाजवळील इगुणी गावात पतीने आपल्या भावाची आणि पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हत्येनंतर त्या दोघांचेही मृत्यदेह त्याने झाडाला बांधून ठेवले. मृत वहिनीचं नाव लालती देवी (45) तर दिराचं नाव कुंदन मांझी होतं. वहिनी 45 वर्षांची तर दीर अवघा 20 वर्षंचा होता. दोघांच्या वयात 25 वर्षांचं अंतर होतं.

काय घडलं नेमकं?

25 वर्षाने लहान असलेल्या आपल्या दीरासोबत या महिलेचे प्रेमसंबध जुळले होते.

एका आठवड्यापूर्वी लालती देवी ही कुंदनसोबत पळून गेली होती.

या दोघांचे प्रेम प्रकरण समजल्यानंतर आरोपी टुली मांझी यानी त्या दोघांची हत्या करुन त्याचे मृत्यदेह झाडाला बांधले.

टुली मांझीच्या घराच्या जवळपासच्या शेतातमध्येच एका झाडाला बांधलेले हे मृत्यदेह सापडले.

या प्रकरणात पोलिसांनी टुली मांझी आणि सासऱ्याला अटक केले आहे.

या खलबळजनक प्रकारामुळे इगुणी गाव हादरलंय. ही घटना समजल्यानंतर लगेच पोलीस घटनास्थळी पोहचले. आता पुढील कारवाई सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *