Tue. May 21st, 2019

पतीच्या अश्लील मॅसेजेसना कंटाळलेल्या पत्नीची पोलिसांकडे धाव…

0Shares

वारंवार पत्नीच्या मोबाईलवर dirty messages पाठवणाऱ्या पतीविरोधात पत्नीने थेट पोलीसांकडे धाव घेतल्याची घटना पिंपरी-चिंचवडच्या कामगार नगर येथे घडली आहे. पिंपरी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना

गेल्या काही महिन्यांपासून 38 वर्षीय पती त्याच्या 35 वर्षीय पत्नीच्या मोबाईलवर वारंवार अश्लील मॅसेजेस करत होता. अखेर त्याला कंटाळून पत्नीने पिंपरी पोलीस ठाणे गाठत पतीविरोधात फिर्याद केली. त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

काय आहे प्रकरण?

4 ते 5 वर्षांपासून पती पत्नीचे पटत नव्हते.

दोघांमध्ये सतत वाद होत असत.

त्यामुळे अखेर दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला

5 महिन्यांपासून ते वेगळे राहात होते.

त्यांना मुलगा आणि मुलगी आहे.

पती नाशिक येथे वाहनचालक म्हणून काम करताे.

तर पत्नी भावाकडे राहते.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून पती सतत पत्नीला अश्लील मॅसेजेस करत होता.

सुरुवातीला पत्नीने अनेक मॅसेजेस delete करत दुर्लक्ष केलं.

मात्र पती वारंवार dirty messages पाठवतच राहिला.

अखेर या अश्लील मॅसेजेसचा अतिरेक होऊ लागल्यावर पत्नीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *