Tue. Oct 26th, 2021

तबलिगी जमातीच्या लोकांनी माफी मागावी- हुसेन दलवाई

तबलिगी जमातीच्या लोकांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केली आहे. आपली लढाई कोरोनाविरोधात आहे. या लढाईदरम्यान सरकारकडून काही चुका झाल्या असल्या, तरी सरकारवर टीका करण्याची ही वेळ नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.  

विदेशातून आलेले लोक कसे काय फिरत होते, असा सवालही त्यांनी केला आणि त्याचबरोबर या गोष्टीचं समर्थन होऊ शकत नाही, अशी भूमिकादेखील त्यांनी मांडली. लॉकडाऊननंतर धार्मिक स्थळंदेखील बंद करण्यात आली आहेत. तरीही या कार्यक्रमाचं आंदोलन झालं आणि त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराचा धोका वाढला. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मौलाना मोहम्मद साद कांढलवी आणि तबलिगी जमातच्या इतर आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामारी कायदा १८९७ आणि भारतीय दंड विधानाच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *