Sat. Mar 6th, 2021

Hyundai ने Grand i10 Nios कार भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ही कार Sportz आणि Sportz Dual Tone अशा दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असेल. या कारमध्ये Bs6 कम्लायंट 1.0 लिटर टर्बो GDi इंजिन आहे. टर्बोचार्ज्ड इंजिन 998 cc चं आहे. हे इंजिन 5 Speed Manual Standard Gearbox असणारं आहे. 6000 rpm वर 99 bhp ची ऊर्जा आणि 1,500  ते 4,000 rpm दरम्यान 172 Nm टॉर्क निर्माण करतं.

काय आहेत या कारची वैशिष्ट्यं?

टर्बो व्हर्जनमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प, 15 इंच डायमंड कट अलॉय व्हिल्स, कलर इन्सर्ट आहे.

ब्लॅक इंटिरिअरसोबत लेदर फिनिश स्टिअरिंग व्हिल, वायरलेस चार्जर, फ्रंट USB चार्जरही या कारमध्ये आहे.   

कारच्या फ्रंट ग्रिलवर Turbo बॅजिंग आहे.

रंग

ही कार डयुएल टोन कलर्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ब्लॅक रूफ, फेअरी रेड, पोलर व्हाईट ये रंग उपलब्ध आहेत.

सिंगल टोन कलरमध्ये अॅक्वा टील आणि पोलर व्हाईट हे रंग मिळू शकतात.

किंमत-

Hyundai Grand i10 Nios Sportz ची किंमत 7.68 लाख रुपये आहे.

तर  Hyundai Grand i10 Nios Sportz Dual Tone ची किंमत 7.68 लाख आणि 7.73 लाख रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *