Jaimaharashtra news

दानवे – खोतकर वाद सुरूच, लोकसभा निवडणूक लढणार खोतकरांचा दावा

जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील बेबनाव अजूनही मिटल्याचे दिसत नाही. दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आपण अजूनही निवडणुकीच्या रिंगणात असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा लढणार असल्याचं त्यांनी सांगीतलं आहे.

अर्जुन खोतकर यांनी बुधवारी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आणि दानवे यांनी शिवसैनिकांना दिलेली त्रासाबद्दल सांगितले. उद्धव ठाकरेंचा कोणताही निर्णय मला मान्य असेल आणि उद्धव ठाकरे माझ्या हिताचाच निर्णय घेतील.पण अजूनतरी माझ्यापर्यंत कोणताही निर्णय आलेला नाही.असे ते म्हणाले आहेत.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मध्यस्थीचा प्रयत्न

रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील संघर्ष पराकोटीला गेल्याने खोतकर यांनी दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मध्यस्थ म्हणून खोतकर यांचा राग शांत करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

देशमुख-दानवे यांनी खोतकरांच्या घरी हजेरी लावल्यानंतरही खोतकर यांनी माघार घेतली नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंगळवारी रात्री खोतकर यांना ‘वर्षां’ बंगल्यावर बोलावून राग सोडा एकत्र काम करू असं समजवलं होत.

आम्हीपण युतीतच होतो ना, मंत्रीही होतो. मग जालन्यात शिवसैनिकांना जाणीवपूर्वक त्रास का दिला, असा सवाल खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

बुधवारी खोतकर यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दानवे यांनी जालन्यातील शिवसैनिकांना कशा प्रकारे त्रास दिला, हे ठाकरेंना सांगितले.

मुख्यमंत्री आणि दानवे एकत्र भेटणार आहेत. तेव्हा यावर निर्णय घेवू असं उद्धव यांनी सांगितलं आहे.

Exit mobile version