Tue. Jun 28th, 2022

मी मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार आहे – मुख्यमंत्री ठाकरे

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकरला आहे. तर त्यांच्यासोबत ४० आमदार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. दरम्यान, शिंदे यांचा बंड अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

‘शिवसैनिक म्हणाला तर पक्षप्रमुख पदही सोडेन’

स्वकीयांचे वार जास्त वेदनादायी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. बंडखोरांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावं, मी मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार आहे. माझा राजीनामा तयार आहे. शिवसैनिक म्हणाला तर पक्षप्रमुख पदही सोडेन, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री पद सोडण्याचे मी नाटक करत नाहीए, मात्र माझ्यानंतर मुख्यमंत्री शिवसैनिकच असला पाहिजे, असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

‘हिंदुत्व आणि शिवसेना वेगळे होऊ शकत नाही’

शिवसेनाप्रमुखांनी शब्द दिला आहे की हिंदुत्व आमचा श्वास आहे. आणि त्यांचाच विचार मी पुढे नेत आहे. तसेच विधानभवनात हिंदुत्वाबद्दल बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं नसून हिंदुत्व आणि शिवसेना वेगळे होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

‘मी मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक नव्हतो’

मी मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक नव्हतो. महाविकास आघाडी स्थापन करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदासारखी महत्त्वाची जबाबदारी घेण्यास सांगितल्यामुळे मी मुख्यमंत्री झालो आहे. यासाठी शरद पवारांचा मोठा पाठिंबा मला आहे. मात्र, राज्यात सुरू असलेल्या घडामोडींमुळे मला धक्का बसला आहे. माझ्याच माणसांना मी नकोय, तर मी काय करायचे? असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांन उपस्थित केला. बंडखोरी आमदारांपैकी एकाही आमदाराने सांगितले की मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईल, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. आणि यावर विश्वास नसेल तर मी आजच वर्षावरून मातोश्रीवर जातो, असेही ते म्हणाले.

‘कोरोनाकाळात उत्तम काम केले’

गेली अडीच वर्ष सर्वत्र कोरोनाचा कहर होता. तसेच तब्येतीमुळे मी तुम्हाला भेटू शकत नव्हतो. आज मी कोरोनाबाधित आहे. त्यामुळे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यासोबत संवाद सांधत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुरुवातीला म्हणाले. तसेच कोरोनाकाळात उत्तम काम केले असल्याचेही मुख्यमंत्री ठाकेर म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे अनेकांना मंत्रीपदे मिळाली असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मी बोलत असताना अनेकदा सांगण्यात आले की, तुम्ही आमच्या कुटुंबाचे वाटतात. लोकांचे हे प्रेम मला महत्त्वाचे आहे. निवडणुकांआधी मंत्र्यांना, शिवसैनिकांना समजावलं होता. मात्र, लोकशाहीत लघुशंकेला गेलात तरी शंका घेतली जाते, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. त्यामुळे आता माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री पदी नको असेल तर बंडखोरी आमदारांनी मला सांगावे, मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.