‘मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो’ – नाना पटोले

भंडारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेलकी भाषेचा वापर केला. यावेळी त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले. मी मोदीला मारुही शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केले. मात्र नाना पटोले यांचे वक्तव्य वादात सापडले आहे.
भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे आपली बाजू मजबूत करण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या. मात्र संध्यकाळी घेण्यात आलेल्या प्रचार सभेदरम्यान त्यांचा तोल ढासळला. यावेळी त्यांनी मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, असे वक्तव्य केले. तसा व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून पटोले यांच्याविरोधात रोष व्यक्त होताना दिसत आहे.
भंडारा जिल्ह्यात प्रचारसभेतला नाना पटोले यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, ‘मी इतकी वर्षे राजकारण करत आहे, परंतु एक शाळा माझ्या नावावर नाही. इथून पाठीमागे एक ठेकेदारी केली नाही. जो आला त्याला कायम मदत करत आहे. म्हणून मी मोदीला मारू शकतो आणि त्याला शिव्याही देऊ शकतो.’