मला भगव्या शालीची गरज नाही – मुख्यमंत्री

शिवसेनेने मुंबईत शिवनेरीची प्रतिकृती उभारली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई विमानतळावर शिवनेरीच्या प्रतिकृतीचं उदघाटन झालं. मला भगव्या शालीची गरज नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. त्यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यासोबतच ‘मला जे बोलायचे आहे ते १४ तारखेला बोलेनच’ असंही ते म्हणाले.