Thu. Jun 17th, 2021

निवडणूक आयोगाकडून मला काहीही अपेक्षा नाही – राज ठाकरे

EVM मशीनमध्ये घोळ असल्याचे विरोधकांनी अनेकदा म्हटलं आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक आयोगाकडून मला काहीही अपेक्षा नसल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावरूनच समजते की त्यांना आमच्या बोलण्यात काही महत्त्वाचे वाटत नाही असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले राज ठाकरे ?

लोकसभा निवडणुकांवेळीच EVM मशीनवर शंका व्यक्त करण्यात येत होती.

विरोधकांनी EVM मशीनवर संशय व्यक्त केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीला जाऊन निवडणूक आयोगाची भेट घेतली.

या भेटीमध्ये EVM संदर्भात चर्चा झाल्याचे समजते आहे.

मात्र निवडणूक आयोगाकडून काहीही अपेक्षा नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

आयुक्तांशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावमुळे आमच्या बोलण्यात महत्त्वाचे वाटत नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी बॅलेट पेपरची मागणी केली आहे.

मॅच फिक्स असेल तर तयारी करण्यात काय अर्थ असल्याचे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

तसेच EVM चीप हॅक होण्याची शक्यता असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी भाजपा सुद्धा EVMमशीनवर शंका व्यक्त करत होती.

मात्र आता काहीच बोलत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.

तसेच महिना-दोन महिना निवडणुका पार पडत तर मतमोजणीसाठी दोन दिवस गेले तर काय बिघडतं ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

बॅलेट पेपरची मागणी केली असली तरी मला निवडणूक आयोगाकडून काही अपेक्षा नसल्याचे म्हटलं.

मी बॅलेट पेपरच्या मागणी सदर्भात औपचारिकता म्हणून पत्र दिले होते.

तसेच निवडणूक आयोगाला आमचे म्हणणे महत्त्वाचे नसल्याचेही वाटलं असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं .

मात्र पुढे कोणी काही म्हणायला नको आणि बॅलेट पेपरची मागणी होती तरी राज ठाकरे आयोगाकडे का गेले नाहीत ? असाही प्रश्न उपस्थित करतील असे राज ठाकरे म्हणाले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *