एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही – ममता

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाच्या एक्झिट पोलमुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. जनतेने पुन्हा एकदा मोदी आणि भाजपा सरकारला पंसती दिली आहे. त्यामुळे अनेक विरोधकांनी हा एक्झिट पोल नाकारला असून चुकीचा किंवा खोटा असल्याचे म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचे म्हटलं आहे.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी ?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेता ममता बॅनर्जी यांनी एक्झिट पोल चुकीचा असल्याचे म्हटलं आहे.

एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही, रणनितीचा वापर फक्त EVMमध्ये घोटाळा करण्यासाठी केला जात आहे, असे ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे.

विरोधी पक्षांना एकजूट, मजबूत आणि धाडसी राहायला हवे. तसेच आपण लढाई एकत्र लढणार आहोत असेही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच एक्झिट पोलनुसार यंदा पश्चिम बंगालमध्ये जास्तीत जास्त जागा भाजपा जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भाजपा बंगालमधील 42 जागांपैकी 19 ते 23 जागा जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तसेच कॉंग्रेस फक्त एकच जागेवर निवडून येणार आहे.

तृणमूल कॉंग्रेसला 19 जागा मिळणार असल्याचे स्पष्ट एक्झिट पोलमध्ये स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे देशात पुन्हा एकदा मोदी लाट स्पष्ट दिसून येत आहे.

 

 

 

 

Exit mobile version