शपथविधीच्या पासवरून वाद नको – शरद पवार

30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदासाठी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांच्या मंत्रीमंडळाने सुद्धा शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती. कॉंगेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला होता.

नेमकं प्रकरण काय ?

शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज राजकीय नेत्यांसह कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे.

मात्र काहींनी या शपथविधी सोहळ्याला पाठ दाखवली होती.

त्यापैकी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीही बहिष्कार टाकला होता.

पाचव्या रांगेत स्थान दिल्याने मोदींनी त्यांचा अपमान केल्याची भावना शरद पवारांना असल्यामुळे त्यांनी शपथविधीला जाणं टाळलं.

मात्र शरद पवार यांना पहिल्या रांगेतील पास दिल्याचा दावा राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आला आहे.

यावर बोलताना शरद पवार म्हणाले, माझ्या जागेची चौकशी केल्यावर पाचव्या रांगेत असल्याचे सांगण्यात आले होते.

मला यासंदर्भात वाद वाढवायचा नाही.

तसेच त्यांच्या कार्यालयामधून चूक झाली असावी किंवा माझ्या कार्यालयातून असेल.

मला या विषयावर मोठा वाद निर्माण करायचा नसून इथेच संपवला पाहिजे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

 

Exit mobile version