Sat. Sep 21st, 2019

अपघातात पाय गमवला तरी मानसीेने मिळवले पॅरालंपिकमध्ये सुवर्ण पदक

बासेल येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये एसएल-3 च्या अंतिम सामन्यात हमवतन पारुल परमारचा पराभव करत मानसी जोशीने जेतेपदावर तिचे नाव कोरले.

0Shares

2011 मध्ये मानसी जोशीला अपघातात मानसीला आपला एक पाय गमवावा लागला होता. पण यातूनही जिद्द न हारता तिने बासेल येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये एसएल-3 च्या अंतिम सामन्यात हमवतन पारुल परमारचा पराभव करत मानसी जोशीने जेतेपदावर तिचे नाव कोरले आहे.

मानसी जोशीचे यश!

बासेल येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये एसएल-3 च्या अंतिम सामन्यात हमवतन पारुल परमारचा पराभव करत मानसी जोशीने जेतेपदावर तिचे नाव कोरले. अंतिम सामन्यात मानसीने 21-12, 21-7 च्या फरकाने पारुल परमारला पराभूत केले.

2011 मध्ये एका अपघातामध्ये मानसीला आपला पाय गमावावा लागला होता. रूग्णालयात तिच्यावर तब्बल ५० दिवस उपचार सुरू होते. या अपघातानंतर आठ वर्षांनी मानसीने मैदानावर पुनरागमन करत जेतेपदावर सुवर्ण अक्षरात नाव कोरले आहे. पुण्यात गोपीचंद यांच्या अकाडमीमध्ये मानसी प्रशिक्षण घेतेय. मानसीने तीन वेळा विश्व चॅम्पियन परमारला शनिवारी 21-12, 21-7 च्या मोठ्या फरकाने पराभूत केले.

भारतीय पॅरालंपिक समितीने मानसीच्या या विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण 14 पदके जिंकली आहे. यामध्ये तीन सुवर्ण पदकांचा समावेश आहे.

विजयानंतर  मानसीचे मत

‘हा विजय माझ्यासाठी एखादं स्वप्न साकार झाल्यासारखं आहे. पुनरागमन करण्यासाठी मी अतिशय कठीन ट्रेनिंग घेतली आहे. एका दिवसात तिन ट्रेनिंग सेशनमध्ये सहभाग नोंदवला आहे. असं पहिल्यांदाच पॅरालंपिकमध्ये विश्वविजेपद मिळवणारी मानसी जोशीने सांगितले.

मानसीने फिटनेसवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी वजनही कमी केलं आहे. नवीन उर्जा या जेतेपदामुळे मला मिळाली आहे.’ असंही ती यावेळेस म्हणाली.

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *