Fri. Oct 7th, 2022

प्रकाश राजसोबत योगायोग विलक्षण; तिथेच आज मतदान जिथे घेतलं बालपणी शिक्षण

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून राजकीय नेत्यांसह अनेक दिग्गज कलाकारांही मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी अभिनेते प्रकाश राज यांनी सुद्धा बंगळुरू येथील मतदान केंद्रावर मतदान बजावले. मतदान केल्यानंतर प्रकाश राज यांनी ट्विटरच्या माध्यामातून एक माहिती शेअर केली आहे. ज्या शाळेत शिकलो तेच माझे मतदान केंद्र होते. विशेष म्हणजे ज्या वर्गात मी शिकलो तिथेच मला मतदान करण्याची संधी मिळाली.

अभिनेते प्रकाश राज यांनी आज बंगळूरुमध्ये मतदान केले.

41 वर्षापूर्वी ज्या शाळेत ते शिकत होते. त्याच शाळेत त्यांना मतदान करण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलं आहे.

प्रकाश राज यंदा लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.

बंगळूरु सेंट्रल येथून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

प्रकाश राज यांनी नेहमी पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

त्यांनी नेहमी राजकीय मत ठामपणे व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकीय विचारधारा विरोधात अनेकदा प्रकाश राज यांनी मोर्चा काढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.