Mon. Jan 24th, 2022

राखी सावंत केला एक अनोखा दावा

मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत ही कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या राखीने एक अनोखा दावा केला आहे. ज्यामुळे राखीला काही नेटकऱ्यांनी गोंडस म्हटलं आहे तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे. राखीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत राखीने एक विचित्र दावा केल्याचं दिसत आहे. राखीने या व्हिडिओत म्हटलं आहे. “देशात कोरोना व्हॅक्सिनची कमतरता आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे की मला मिळणारी लस ही गरजूंना मिळाली पाहिजे. मला कोरोना होऊ शकतं नाही, कारण माझ्या शरीरात येशुचं पवित्र रक्त आहे. त्यामुळेच मला आणि माझ्या कुटुंबाला कोरोनाची लागण होणार नाही,” असं राखी म्हणाली. यावेळी राखी ही मुंबईतील लोखंडवाला परिसरातील एका कॉफी शॉपच्या बाहेर राखी होती. बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. राखी पुढे म्हणाली, “मी माझ्या सगळ्या वाईट सवयी सोडल्या आहेत. फक्त थोडा राग येतो मला आणि तेही ठीक होईल.” राखीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केली आहे. एक नेटकरी म्हणाला, “तुझ्या शरीरात येशुचं पवित्र रक्त आहे तर तू रक्त दान कर.” दुसरा नेटकरी म्हणाला, “राखी खूप गोंडस आहे.” अशा कमेंट करत कोणी राखीला बालिश म्हटलं आहे तर कोणी राखीला ट्रोल केलं आहे. याशिवाय राखी अनेकवेळा तिच्या पतीमुळे देखील चर्चेत असते. राखीच्या पतीला आजपर्यंत कोणी पाहिले नाही आहे फक्त राखीने त्याचं नाव रितेश असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे ती खोटं बोलत असल्याचा आरोप अनेकांनी तिच्यावर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *