मी तर आत्ताच शपथ घेतली, खिसे अजून गरम व्हायचेत – यशोमती ठाकूर

महाविकास आघाडीचे सरकार येऊनही गेल्या अनेक दिवसांपासून खातेवाटपाचा तिढा सुटत नव्हता. मात्र आता याला पूर्णविराम मिळाला आहे. अखेर आज महाविकास आघाडीचे खातेवाटप जाहीर झाले. या खातेवाटपामध्ये अनेक नव्या नेत्यांना संधी दिली आहे.
नुकतीच कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी कॅबिनेट पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान वाशिम मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीच्या प्रचारात त्यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यामुळे त्या चांगच्याच चर्चेत येत आहेत.
काय म्हणाल्या यशोमती ठाकूर ?
वाशिममध्ये महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रचारसभेत पैसे विरोधकांचे घ्या, पण मतदान काँग्रेसला करा. मी तर आत्ताच शपथ घेतली आहे. खिसे गरम अजून व्हायचे आहेत. यावरून निवडणूक प्रचारात पैसेवाटपाचे समर्थन मंत्री महोदयांकडूनच केल्याचे चित्र दिसून येत आहे.
अशा प्रकारचे धक्कादायक विधान त्यांनी यावेळी केले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकार काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.