Sat. Jul 31st, 2021

केदारनाथचा विकास करण्याची इच्छा – मोदी

लोकसभा निवडणुकीचा आज सातव्या आणि शेवटचा टप्प्यातील मतदान सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी या मतदारसंघातही आज मतदान होत आहे. पंतप्रधान मोदी सध्या केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रेवर आहेत. मोदींनी 18 तास गुहेत ध्यानधारणा केली असून त्यांनी सकाळी मीडियाशी संवाद साधला आहे. ‘माझं आणि केदारनाथचं एक वेगळंच नातं’ असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रेवर आहेत.

शनिवारी रात्रीपासून मोदींनी 18 तास गुहेत बसून ध्यानधारणा केली.

केदारनाथ आणि माझं एक वेगळंच नातं आहे, असे मीडियाशी संवाद साधताना मोदी म्हणाले.

तसेच मी देवाच्या चरणी आल्यानंतर काहीच मागत नाही.

देवाने आपली निर्मिती देण्यासाठी केली असून मागण्यासाठी केली नसल्याचे त्यांनी म्हटलं.

केदारनाथचा विकास करण्याची मनापासून इच्छा असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या दोन वर्षात मोदींनी चौथ्यांदा केदारनाथला भेट दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *