Wed. Jun 26th, 2019

मी माध्यमांना घाबरणारा पंतप्रधान नव्हतो – डॉ. मनमोहन सिंग

0Shares

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. मी असा पंतप्रधान नव्हतो, जो पत्रकार परिषदेत बोलायला घाबरायचो. मी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी कायम संवाद साधत आलो आहे. मी परराष्ट्र दौऱ्यावरून परतल्यानंतर नेहमीच पत्रकार परिषद घेत होतो, असेही मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

तसेच मी फक्त एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर नव्हतो, तर देशाचा एक्सिडेंटल फायनान्स मिनिस्टरही होतो. ‘चेंजिंग इंडिया’या कार्यक्रमात सहभागी होत मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. केंद्र सरकार आणि आरबीआयचा संबंध हा पती-पत्नीसारखा आहे. दोन्ही संस्थांमध्ये ताळमेळ बसेल अशा पद्धतीने विचारांचे समाधान शोधले पाहिजे. विशेष म्हणजे केंद्राचा आरबीआयच्या पैशावर डोळा असतानाच मनमोहन सिंग यांनी हे विधान केले आहे. तसेच केंद्र सरकार आणि आरबीआयमध्ये झालेल्या मतभेदांमुळे ऊर्जित पटेल यांनीही गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला. अशा परिस्थितीत मनमोहन सिंग यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आरबीआयचे गव्हर्नरपदही भूषवलं होतं. मनमोहन सिंग म्हणाले, आरबीआयची स्वायत्तता आणि स्वातंत्र्याचा सन्मान केला पाहिजे. तसेच केंद्र सरकार आणि आरबीआयमध्ये पती-पत्नीसारखं नाते पाहिजे. मतभेद असू शकतात, पण त्याचे समाधान दोन्ही संस्थांनी सामंजस्यपद्धतीने शोधले पाहिजे. तसेच मनमोहन सिंग यांनी यावेळी शक्तिकांत दास यांना आरबीआय गव्हर्नरपदाबद्दल शुभेच्छाही दिल्या.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: