Sun. Jun 20th, 2021

मी पुन्हा येईन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

काही महिन्यांतच आगामी विधानसभा निवडणुका पार पडणार असून विधिमंडळाचे शेवटचे अधिवेशन सुरू होते. या शेवटच्या अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा पाढा वाचला. तर पुढच्या सरकारमध्ये पुन्हा येईन असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन पार पडले.

या शेवटच्या अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कामाबद्दल सांगितले.

गेल्या पाच वर्षात काम करताना अनेक अडचणी आल्या, बरेच आव्हानांना सामोरे जावे लागले असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे वैभव परत आणण्यात मी यशस्वी ठरलो असल्याचे मत फडणवीस यांनी मांडले.

आगामी सरकारमध्ये मी पुन्हा येईन, याच निर्धाराने, याच भूमिकेत, याच ठिकाणी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्धार व्यक्त केला आहे.

मात्र जनतेला गृहित धरू नये आणि बचेंगे तो और भी लढेंगे असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *