Tue. Jun 2nd, 2020

मी पुन्हा येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काही महिन्यातच विधानसभा निवडणुका पार पडणार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपाच्या कार्यकरिणी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यांच्या अथक मेहनतीमुळे फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची पायरी चढली. तसेच पद न मिळालेल्या कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांनी विशेष आभार मानले आहे. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ऑगस्ट महिन्यात महाजनादेश यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

माझे स्वता:चे कारखाने नसल्यामुळे माझ्याकडे गमवण्यासारखं काही नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

तसेच माझ्यासोबत कार्यकर्त्यांची दैवी शक्ती असल्याचे म्हटलं आहे.

विरोधकांनी नेहमी सत्तेचा गैरवापर केला आहे.

विरोधकांनी जनतेला गृहीत धरण्याची घोडचूक करू नये असे मुख्यमंत्री म्हणाले.

रणांगण बदलय, रणनिती बदलावी लागणार आहे.

निल आर्मस्ट्रॉंगची गोष्ट सांगत  पुढाकार कोण घेणार हे महत्त्वाचे ? असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

विधानसभेसाठी जोरात तयारी करायची आहे.

राज्याच्या जनतेच्या दर्शनासाठी महाजनादेश यात्रा काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दुष्काळावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली.

दुष्काळाच्या नावाखाली लोकांनी आपल्या तिजोऱ्या भरल्या आहेत.

यात्रेबरोबरच सरकारचे काम ही करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहे.

दुष्काळाला भूतकाळ बनवायचं आहे.

रोजगार निर्मितीत महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणला.

पुढच्या पिढीला दुष्काळा भोगू देणार नाही.

आगामी निवडणुका युतीतच लढणार.

मी फक्त भाजपाचाच नाही तर सर्व मित्रपक्षाचा मुख्यमंत्री.

जागांचा निर्णय लवकरच घेऊ.

मुख्यमंत्रिपदावरून युतीत वाद नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपात वशिल्याने नाही तर पात्रतेने जागा मिळत असल्याचेही म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *