Tue. Sep 27th, 2022

फक्त सत्ता हाती द्या, मी चमत्कार घडवेन- राज ठाकरे

‘प्रत्येक कार्यक्रमाला गेलं की मी बोललंच पाहिजे, असं काही नाही. सारखं सारखं ऐकून लोकांना कंटाळा येतो. त्यामुळे आता मी बोलणारच नाही. बोलण्यासाठी मी आचारसंहितेची वाट पाहत आहे आणि माझ्याकडे निवडणुकीचा तोफखाना तयार आहे. त्यामुळे मी योग्य वेळी आग ओकणार,’ असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. तसंच माझ्या हातात सत्ता द्या.चमत्कार घडवून दाखवू असंही ते म्हणाले. कोंढवा खुर्द येथील स्व.राजेंद्र बाळासाहेब लोणकर e- learning स्कूलच्या भूमिपूजनात राज ठाकरे बोलत होते.

काय म्हणाले राज ठाकरे?

निवडणुकीच्या वेळी तोफखाना बरोबर घेउन येईल व तुमच्यासमोर फोडेल.

योग्य ठिकाणी योग्य गोष्टी बोलल्या की त्या योग्य ठिकाणी पोहचतात.

म्हणून तुम्ही फक्त वाट पहा, अशी विनंती राज यांनी केली.

या निवडणुकीत मनसेचे दोन नगरसेवक महापालिकेत निवडून आले.

ते दोन्ही नगरसेवक चांगले काम करत आहेत.

त्यांच्या कामामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखत आहे.

यावेळी पुणे महानगरपालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे,स्थानिक नगरसेवक साईनाथ बाबर, माजी नगरसेविका आरती बाबर, रुपाली पाटील, किशोर शिंदे, शेखर लोणकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.