Fri. Jan 21st, 2022

दोषमुक्त सिद्ध झाल्यावरच मी राजकारणात येईन – रॉबर्ट वाड्रा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पाठोपाठ त्यांची बहीण प्रियांका गांधी आता राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. मात्र त्याचवेळी त्यांचे पती  रॉबर्ट वाड्रा यांची मात्र आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसूली संचालनाकडून चौकशी सुरू आहे. अशाही परिस्थितीत रॉबर्ट वाड्रा आपल्या पत्नीपाठोपाठ राजकारणात पाऊल ठेवणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नावर खुद्द रॉबर्ट बाड्रा यांनीच उत्तर दिलंय…

“निर्दोष सिद्ध झाल्यावरच राजकारणात प्रवेश करेन!”

“मी या देशात राहतो. ज्यांनी या देशाला लुटलं ते तर देशाबाहेर पळून गेले. त्यांचं काय? मी भारत सोडून जाणार नाही. तसंच माझी चौकशी होईपर्यंत मी सक्रिय राजकारणातही उतरणार नाही. हा माझा शब्द आहे,” असं रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच वाड्राही राजकारणात येणार, अशी चर्चा रंगली होती.

जनतेची  सेवा करण्यासाठी आपणही मोठी भूमिका बजावणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

वाड्रा हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे असूनही सध्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

अशा प्रसंगातही निर्दोष झाल्याशिवाय मी रजकारणात प्रवेश करणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

याचाच अर्थ ते निर्दोष ठरल्यास ते राजकारणात उतरू शकतात, असा होरा आहे.

हे ही वाचा- रॉबर्ट वाड्रा, चिदंबरम यांची तपासणी करा पण राफेललाही उत्तर द्या – राहुल गांधी

कोणत्या प्रकरणात सुरू आहे वाड्रा यांची चौकशी?

रॉबर्ट वाड्रा यांनी 2005 ते 2010 या पाच वर्षांत लंडनमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी केली होती.

खरेदीच्यावेळी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा यंत्रणेला संशय आला.

त्यामुळे त्यांची चौकशी सुरू आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *