Tue. Jun 15th, 2021

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचे पाणी बिल मी भरणार – जितेंद्र आव्हाड

मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवास्थान ‘वर्षा’चे पाणी बिल भरले नसल्यामुळे बंगल्याचा समावेश डिफॉल्टर यादीत करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघात केला आहे. पाण्याचे बिल मी स्वत: भरतो अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?

मुंबईतील मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगल्याच्या पाण्याचे बिल भरले नसल्यामुळे मुंबई महापालिकेने डिफॉल्टर यादीत समावेश केला आहे.

यासंदर्भात माहिती विरोधकांना मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी पाण्याचे बिल भरले नसले तर मी त्यांचे बिल भरतो असे जितेंद्र आव्हाड म्हणले.

मुख्यमंत्र्यांच्या घरी देश-विदेशातून पाहुणे येतात.

तसेच त्यांच्याकडे वेळ नसल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहे.

पाहुणे घरी आल्यावर पाण्याची कपात होऊ नये.

तसेच आंघोळीला आणि इतर गोष्टींसाठी उशीर होऊ नये म्हणून मी बिल भरत असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात येणाऱ्या पाण्याचे बिल भरण्याचे राज्य सरकारकडे पैसे नसतील तर मग जनतेचे काय? असेही म्हटलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *