Tue. Jun 28th, 2022

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची १५ जून रोजी अयोध्याला जाण्याची तयारी सुरू आहे. त्यांचा ठरल्याप्रमाणे दौर होणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. दरम्यान राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा अखेर स्थगित करण्यात आलेला आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही पक्षांचा अयोधा दौरा होता तो त्यांनी स्थगित केला आहे. त्यांना काही सहकार्य लागले असते तर आम्ही त्यांना सहकार्य केलं असतं. असही संजय राऊत म्हणाले. मात्र राज ठाकरेंच्या दौऱ्याला भाजपने विरोध का केला, हे समजत नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. पण भाजप प्रत्येक वेळी राजकीय स्वार्थासाठी अशा खेळी करते. यातून लोकांना शहानपणा आला तर बरं होईल. आपण वापरले जात आहोत हे काही लोकांना उशीरा समजले आहे. पण मला यात राजकारण करायते नाही असही संजय राऊत म्हाणाले आहेत.

पर्यावरमंत्री आदित्य ठाकरेंचा दौरा

दरम्यान, ठरल्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा होणार आहे. १५ जूनला आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमची तयारी सुरु असल्याचे राऊत म्हणाले. तिथे ते इस्कॉन मंदिरालाही भेट देणार आहेत. त्यांना तसे निमंत्रण आले आहे. तसेच आदित्य ठाकरे तिथे काही प्रमुख लोकांना भेटणार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. रामलल्लाच्या दर्शनाला कोणीही जाऊ शकते. हा आमचा धार्मिक कार्यक्रम असून राजकीय नाही. शिवसेना आणि अयोध्या यांचे एक भावनिक नातं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील अयोध्या दौऱ्यावर गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.