IAFचे बेपत्ता झालेले एएन 32 विमानातील 13 जणांचा मृत्यू

3 जून रोजी बेपत्ता झालेले भारतीय हवाई दलाचे एएन 32 विमानाचे काही अवशेष सापडले. त्याचबरोबर या विमानात एकूण 13 जणं प्रवास करत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. शोध पथकाने अनेक दिवस शोध घेतल्यानंतर विमानाचे अवशेष सापडल्याचे समजते आहे.

नेमकं काय घडलं ?

भारतीय हवाई दलाचे एएन 32 मालवाहू विमान बेपत्ता झाले.
या विमानाचा शोध लष्कराचे सी-130 जे आणि सेना घेत होते.
सोमवारी दुपारच्या सुमारास हे विमान बेपत्ता झाल्याचे समजते आहे.
आसाममधील जोरहाट विमान तळावरून उड्डाण केल्यानंतर संपर्क तुटल्याची माहिती समोर आली होती.
या विमानात 13 जणं असून यामध्ये क्रू मेंबर आणि 5 प्रवाशांचा समावेश होता.
मात्र यामध्ये संपूर्ण 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू  झाल्याचे समजते आहे.
हवाई दलाने याबाबतची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटरच्या अकाऊंटद्वारे दिली आहे.
शोध पथकाला कोणाचेच मृतदेहाचे अवशेष सापडले नसल्याने 13 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
हे विमान चीन सीमेजवळील मेचुका येथे जात असताना ही घटना घडल्याचे समजते आहे.

या अपघाता 13 जणं शहीद –

शहिद जवानांची नावं
विंग कमांडर जी एम चार्ल्स
स्कॉड्रन लीडर एच विनोद
फ्लाइट लेफ्टिनंट आर थापा
फ्लाइट लेफ्टिनंट ए तंवर
फ्लाइट लेफ्टिनंट एस मोहंती
फ्लाइट लेफ्टिनंट एमके गर्ग
वारंट ऑफिसर केके मिश्रा
सार्जेंट अनूप कुमार
कॉरपोरल शेरिन
लीडिंग एयरक्राफ्ट मॅन एसके सिंहट
लीडिंग एयरक्राफ्ट मॅन पंकज
नॉन कॉम्बैंटेट (ई) पुतली
नॉन कॉम्बैंटेट (सी) राजेश कुमार

 

Exit mobile version