Thu. Jun 20th, 2019

IAFचे एएन 32 विमानाचे अवशेष सापडले

0Shares
भारतीय हवाई दलाचे बेपत्ता झालेले एएन 32 विमानाचे अवशेष सापडले असल्याची माहिती समोर आली आहे.एएन 32 हे मालवाहू विमान असून अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झाले होते. मात्र या मालवाहू विमानाचे अवशेष लिपोच्या उत्तरीय भागात सापडले आहेत. हे विमान 3 जून रोजी बेपत्ता झाले होते. शोध पथकाने अनेक दिवस शोध घेतल्यानंतर या विमानाचे अवशेष सापडले आहेत.

नेमकं काय घडलं ?

भारतीय हवाई दलाचे एएन 32 मालवाहू विमान बेपत्ता झाले होते.
या विमानाचा शोध लष्कराचे सी-130 जे आणि सेना घेत होते.
3 जून रोजी दुपारच्या सुमारास हे विमान बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.
आसाममधील जोरहाट विमान तळावरून उड्डाण केल्यानंतर संपर्क तुटला.
या विमानात 13 जणं असून यामध्ये क्रू मेंबर आणि 5 प्रवाशांचा समावेश होता.
हे विमान चीन सीमेजवळील मेचुका येथे जात असताना ही घटना घडला आहे.
या विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशाच्या लिपो भागात सापडले.
या मालवाहू विमानाच्या अन्य भागाचा अधिक शोध सुरू आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: