Sun. Sep 19th, 2021

पाकिस्तान भारताविरोधात मोठे कारस्थान रचत असल्याचा आयबीचा दावा

पाक भारता विरोधात मोठे कारस्थान रचत असल्याचा दावा आयबीने केला आहे. या कारस्थानाला वळण देण्यासाठी पाकिस्तानने गुप्तपणे जैश ए मोहम्मदचा प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अजहरची जेलमधून सुटका केली आहे.

भारत-पाकिस्तान सीमेवर नेहमीच हालचाली होत असतात. पाक भारता विरुद्ध अनेक कट रचतो. भारत त्याचे चोख प्रत्यूत्तर देतो. पाक मध्ये विविध हालचाली होत असतात. त्या हालचालींची खबर वेळोवेळी भारताला मिळत असते. दरम्यान भारतीय गुप्तचर संस्थेने पाककडून गुजरात सीमेवर होत असलेल्या हालचाली संदर्भात भारताला इशारा दिला आहे.

आयबीचा दावा

पाक भारता विरोधात मोठे कारस्थान रचत असल्याचा दावा आयबीने केला आहे. या कारस्थानाला वळण देण्यासाठी पाकिस्तानने गुप्तपणे जैश ए मोहम्मदचा प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अजहरची जेलमधून सुटका केली आहे.  मसूद अजहर आतंकवादी संघटनेबरोबर मिळून भारतावर आतंकवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे आयबीने स्पष्ट केले  आहे.

सियालकोट – जम्मू आणि राजस्थानच्या सेक्टरमध्ये पाकिस्तान मोठी हालचाल करत आहे. तसेच केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढल्याने पाकिस्तान हे पाऊल उचलेल अशी शक्यता दर्शवली  जात आहे.

या हालचालींमुळे राजस्थान मधील सैन्याला आणि सीमा सुरक्षा दलाला कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज राहायला सांगितले आहे. पाकिस्तानला युध्द नकोय असे वक्तव्य पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले होते, मात्र आम्ही कोणत्याही गोष्टीसाठी तयार आहोत असे पाकिस्तानचे सेनाप्रमुख जनरल कमर बाजवाने सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *