Mon. Jan 17th, 2022

विराट कोहलीला ICC चा ‘स्पिरीट ऑफ क्रिकेट’ पुरस्कार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) च्या 2019 वर्षाच्या पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. यामध्ये टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन विराट कोहलीला ‘स्पिरीट ऑफ क्रिकेट’ (Spirit of Cricket) हा पुरस्कार मिळालंय.

कशाबद्दल मिळाला हा पुरस्कार?

वन डे वर्ल्ड कप (One Day World Cup) स्पर्धेदरम्यान स्टीव्ह स्मिथवर टीका करणाऱ्या प्रेक्षकांना कोहलीने पुढे होत दम दिला होता.

त्याची हिच कृती प्रेक्षकांना भावली होती. विरुद्ध संघातील खेळाडूप्रती त्याची ही भावना पाहून त्याला ICC ने या कृतीला ‘स्पिरीट ऑफ क्रिकेट’ या पुरस्कारानं गौरवलं.

दीपक चहरलाही (Deepak Chehar) या पुरस्कार सोहळ्यात पुरस्काराने गौरवण्यात आलंय. 2019 च्या ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार चहरला देण्यात आलाय. त्यानं बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यात हॅटट्रिकसह 7 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

ट्वेंटी-20त हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय

चेहरने श्रीलंकेच्या अजंथा मेडिंसचा 8 धावांत 6 विकेट घेण्याचा विक्रम मोडला

6/7 – दीपक चहर वि. बांगलादेश, 2019

6/8 – अजंथा मेंडिस वि. झिम्बाब्वे, 2012

6/16- अजंथा मेंडिस वि. ऑस्ट्रेलिया, 2011

6/25 – युजवेंद्र चहल वि. इंग्लंड, 2017

ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेननं 2019 च्या सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार जिंकला. त्याने 2019 मध्ये कसोटीत पदार्पण केलं आणि 11 कसोटी सामन्यांत 64.94च्या सरासरीनं 1104 धावा केल्या. स्कॉटलंडच्या कायले कोएत्झर यानं संलग्न संघटनांमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. त्यानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पात्रता स्पर्धा आणि वन डे क्रिकेटमध्ये 48.88च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *