आयसीसी टी-20 रॅंकिंग : टीम इंडियाच्या खेळाडूंची चलती

टीम इंडियाने शुक्रवारी श्रीलंकेचा तिसऱ्या टी 20 मध्ये 78 धावांनी पराभव केला. याविजयासह टीम इंडियाने 2-0 च्या फरकाने टी-20 मालिका जिंकली.
या मालिका विजयानंतर आयसीसीने टी-20 रॅंकिग जाहीर केली आहे.
या रॅंकिंगमध्ये टीम इंडियाच्या केएल राहुलला आपले सहावे स्थान कायम ठेवण्यात यश आले आहे.
तर कॅप्टन विराट कोहलीला एका क्रमाचा फायदा झाला आहे.
शिखर धवनला देखील एका स्थानचा फायदा झाला आहे. शिखर धवन 612 पॉईंट्ससह 15 व्या क्रमांकावर आहे.
केएल राहुलला 26 पॉइंट्स मिळाले आहे. यासह राहुलचे एकूण 760 पॉईंट्स झाले आहेत.
तसेच वनडे आणि टेस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला विराट टी-20 रॅकिंगमध्ये 683 पॉइंट्ससह 9 व्या क्रमांकावर आला आहे.
टी-20 बॉ़लिंग रॅंकिंगमध्ये टीम इंडियाच्या बॉलर्सनी चांगली कामगिरी केली आहे. मालिकावीर ठरलेल्या नवदीप सैनीने मोठी झेप घेतली आहे.
सैनीने 146 वरुन थेट 98 क्रमांकावर झेप घेतली आहे.
तर तिसऱ्या टी-20 मध्ये अष्टपैलू कामगिरी करत शार्दूल ठाकूर सामनावीर ठरला. शार्दूल ठाकूरने 92 वा क्रमांक मिळवला आहे.
तसेच जस्प्रीत बुमराह देखील 39 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. टी-20 रॅंकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा लेग स्पीनर राशिद खान आहे.
टीम रॅंकिंगच्या बाबतीत अधिकच्या दोन पॉईंट्च्या मदतीने टीम इंडिया पाचव्या क्रमांकावर कायम आहे. टीम इंडियाचे एकूण 260 पॉइंट्स आहेत.
तर श्रीलंकेचं 2 पॉइंट्सचं नुकसान झालं आहे. यामुळे अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांचे 236 पॉइंट्स आहेत.
दरम्यान टीम इंडिया 14 जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. यानंतर न्यूझीलंड विरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.