Thu. Aug 13th, 2020

आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ दोन खेळाडूंची बढती

दुबई : टीम इंडियाने विंडिजचा तिसऱ्या टी-20 मॅचमध्ये पराभव करत 2-1 च्या फरकाने मालिका सीरिज जिंकली. यानंतर टीम इंडियाच्या बॅट्समनच्या रॅंकिंगमध्ये सुधार झाली आहे. आयसीसीने नुकतीच टी-20 रॅंकिंग जाहीर केली आहे. .

या रॅंकिंगमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली टॉप-10 मध्ये पोहचला आहे. तसेच केएल राहुलच्या रॅंकिगमध्ये देखील सुधारणा झाली आहे.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये विराट आणि केएल राहुलने धमाकेदार खेळी केली. आयसीसीच्या सुधारित रँकिंगनुसार विराटने टी-20 रॅंकिंगमध्ये 15 व्या क्रमांकावरुन 10 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

केएल राहुलला देखील फायदा झाला आहे. केएल राहुलने 9व्या क्रमांकावरुन 6 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

रोहितने देखील विंडिज विरुद्ध धमाकेदार खेळी केली. परंतु त्याची टी-20 रॅंकिगमध्ये घसरण झाली आहे. रोहितची 9 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. .

दरम्यान टी-20 सीरिजनंतर विंडिंज टीम इंडिया विरुद्ध 3 मॅचची वनडे सीरिज खेळणार आहे.

एकदिवसीय सामने

पहिली वनडे – 15 डिसेंबर 2019, चेन्नई

दुसरी वनडे – 18 डिसेंबर 2019, विशाखापट्टणम

तिसरी वनडे – 22 डिसेंबर 2019, कटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *