Sun. Nov 29th, 2020

Icc Test Ranking : बुमराहची झेप, विराट कोहली याचं स्थान कायम

न्यूझीलंडने टीम इंडियाचा २ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये व्हॉईटवॉश दिला. यानंतर आयसीसीने टेस्ट रॅंकिग जाहीर केली आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या रॅंकिंगमध्ये टीम इंडियाचा बॉलर Icc Test Ranking जस्प्रीत बुमराह याला ४ क्रमांकाचा फायदा झाला आहे.

जस्प्रीत बुमराहा ४ स्थानांचा फायदा झाला आहे. बुमराहने थेट ११ क्रमांकावरुन ७ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. बुमराहचे टेस्ट रॅंकिगमध्ये एकूण ७७९ रेटिंग पॉ़ईंट्स आहेत.

तसेच आयसीसी टॉप १० टेस्ट बॉलर्स रॅंकिगमध्ये बुमराह एकमेव भारतीय गोलंदाज आहे.

आयसीसी टेस्ट रॅंकिग बॅटिंग

आयसीसी टेस्ट रॅंकिग बॅटिंग कॅटेगरीमध्ये टीम इंडियाच्या ३ खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये कॅप्टन विराट कोहली, उपकर्णधार अंजिक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या तीन खेळाडूंचा समावेश आहे.

आयसीसीच्या टेस्ट रॅंकिगमधील बॅटिंग कॅटेगरीत टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने आपलं स्थान कायम राखलं आहे.

विराट कोहली ८८६ रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

विराट कोहली याला न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत विशेष अशी कामगिरी करता आली नाही. विराटने न्यूझीलंड विरुद्धच्या २ टेस्टमध्ये अवघ्या ३८ धावा केल्या.

चेतेश्वर पुजारा याला दोन स्थानांचा फायदा झाला आहे. पुजाराने नवव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

चेतेश्वर पुजाराचे ताज्या आकडेवारीनुसार एकूण ७६६ रेटिंग्स पॉईंट्स आहेत.

टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन आणि मुंबईकर अंजिक्य रहाणेची मात्र घसरण झाली आहे. अंजिक्य रहाणेला आपलं आठवं स्थान कायम राखण्यास अपयश आलं आहे.

अंजिक्य रहाणेला एका स्थानाचं नुकसान झालंय.

आठव्या क्रमांकावरुन नवव्या क्रमांकावर अंजिक्यची घसरण झाली आहे. अंजिक्य रहाणेचे ७२६ रेटिंग्स पॉईंट्स आहेत.

दरम्यान न्यूझीलंड दौऱ्यानंतर टीम इंडिया मायदेशात साऊथ आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ वनडे मॅचची मालिका खेळण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी साऊथ आफ्रिकेची घोषणा

या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेची घोषणा करण्यात आली आहे.

या वनडे मालिकेला १२ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *