Fri. Aug 12th, 2022

आयसीसी टेस्ट रॅंकिंग : विराट कोहली पहिल्या क्रमांकावर कायम

टीम इंडियाने न्यूझीलंडचा चौथ्या टी-२० सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने ५ सामन्याच्या सीरिजमध्ये ४-० अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे.

विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंडवर टी-२० मालिकेत विजय मिळवला आहे.

दरम्यान आयसीसीने नुकतीच टेस्ट रॅंकिग जाहीर केली. आयसीसीच्या ताज्या टेस्ट रॅंकिगनुसार विराटला आपलं पहिलं स्थान कायम ठेवण्यास यश आले आहे.

विराट कोहली ९२८ पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रलियाचा स्टीव स्मिथ आहे.

स्टीव स्मिथ ९११ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा ७९१ पॉइंट्ससह ६ व्या क्रमांकावर आहे.

तर मराठमोळ्या अजिंक्य रहाणेची टेस्ट रॅंकिंगमध्ये नवव्या स्थानी घसरण झाली आहे. ताज्या रॅंकिंगनुसार अंजिक्य रहाणे ७५९ पॉइंट्ससह ९ व्या क्रमांकावर आहे.

टेस्ट बॉलिंग रॅंकिंगच्या बाबतीत टॉप-१० मध्ये टीम इंडियाच्या ३ बॉलर्सचा समावेश आहे.

यामध्ये जस्प्रीत बुमराह ७९४ पॉइंट्ससह सहाव्या क्रमांकावर विराजमान आहे.

आर आश्विन ७७२ पॉइंट्ससह आठव्या क्रमांकावर आहे. तर मोहम्मद शमी ७७१ पॉइंट्सह ९ व्या स्थानी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.