Sun. Oct 24th, 2021

Women’s T-20 World Cup Final, INDvs AUS : ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात महिला वर्ल्ड कप २० मधील अंतिम सामना आज खेळण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे.

महिला टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहचण्याची टीम इंडियाची ही पहिलीच वेळ आहे. तर ऑस्ट्रेलियाने ४ वेळा टी-२० वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. तसेच ऑस्ट्रेलिया ही गचविजेती टीम आहे.

टीम इंडियाने या वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले आहेत. तसेच ऑस्ट्रेलियालाही टीम इंडियाने पराभूत केलं आहे. त्यामुळे टीम इंडियाचा विश्वास नक्कीच वाढलेला असणार आहे.

टीम इंडियाला शेफाली वर्माकडून धमाकेदार खेळीची अपेक्षा असणार आहे. शेफालीने या वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच चांगली खेळी केली आहे.

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाचा पराभव करत वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे.

टीम ऑस्ट्रेलिया: बेथ मूनी, एलिसा हीली (विकेटकीपर), मेग लॅनिंग (कॅप्टन), सोफी मोलिनेक्स, एश्ले गार्डनर, रचेल हेन्स, निकोला कॅरी, अनाबेल सदरलँड, जेस जोनासन, मेगन शट आणि तायला लॅमिंक

टीम इंडिया : शैफाली वर्मा, स्मृति मंधाना, जेमिमा रॉड्रिगज, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), दीप्ति शर्मा, वेदा कृष्णामूर्ती, शिखा पांडे, तानिया भाटिया (विकेटकीपर), पूनम यादव, राधा पांडे आणि राजेश्वरी गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *