Mon. Dec 6th, 2021

तुम्ही ‘ही’ ‘आईस्क्रीम पाणीपुरी’ खाल्लीय का?

मीरा रोड मध्ये असणाऱ्या एका आईस्क्रिम पार्लरमध्ये तुम्हाला हे पाणीपुरी आईस्क्रिम खाता येणार आहे.

पाणीपुरी हा खाद्यप्रेमींचा आवडता पदार्थ. गोड, तिखट पाण्याने भरलेली पुरी खायला पाणीपुरीच्या स्टॉलवर लोकांची कोपऱ्याकोपऱ्यावर गर्दी झालेली दिसून येते. लोकांचा आणखी एक आवडता पदार्थ म्हणजे आईस्क्रीम… लहान मुलांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच  विविध फ्लेवर्सची ice creams आवडतात. मात्र हे दोन पदार्थ एकत्र असू शकतात का? नाही?… पण मुंबईमध्ये एका ठिकाणी चक्क पाणीपुरी आईस्क्रीम मिळतं. मीरा रोड मध्ये असणाऱ्या एका आईस्क्रिम पार्लरमध्ये तुम्हाला हे पाणीपुरी आईस्क्रीम खाता येणार आहे.

कसं बनवतात पाणीपुरी आईस्क्रीम?

मीरा रोडमधील  एका आईस्क्रीम पार्लरमध्ये पाणीपुरी आईस्क्रीम मिळते.

आईस्क्रीम आणि पाणीपुरी या दोन पूर्णपणे एकमेकांच्या विरुध्द असणाऱ्या  पदार्थांना एकत्र करुन दाखविण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला आहे.

पाणीपुरीच्या पुरीमध्ये मावेल इतकं आईस्क्रीम त्यामध्ये घातलं जातं.

वरती थोडं क्रीम टाकलं जातं.

त्यानंतर त्यावर रंगीबेरंगी स्प्रिंकल्स लावल्या जातात.

अशाप्रकारे serve करण्यात येतं पाणीपुरी आईस्क्रिम.

फ्लेवर्सची जोड…

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जो फ्लेवर पाहिजे असेल त्या फ्लेवरमध्ये तुम्ही पाणीपुरीचा आस्वाद घेऊ शकता.

चिंच, जांभूळ या फ्लेवर्सचाही त्यात समावेश आहे.

पण बेल्जियम डार्क चॉकलेटला सर्वात जास्त पसंती दिली जाते.

त्यामुळे या पाणीपुरी आईस्क्रिमचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी

“गो प्युअर नॅच्युरल” पार्लरला आवर्जून भेट द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *