Sat. May 25th, 2019

चंदा कोचर यांची ईडीकडून 8 तासांपेक्षा जास्त काळ चौकशी

0Shares

ईडीनं (अंमलबजावणी संचालनालय) आयसीआयसीच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि पती दीपक कोचर यांची सोमवारी आठ तासांपेक्षा जास्त काळ चौकशी केली आहे. व्हिडीओकॉन कंपनीला बेहिशेबी कर्ज दिल्याप्रकरणी  त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. चंदा कोचर यांनी 3520 कोटींचे कर्ज वाटपामध्ये  भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. सकाळी 11 वाजल्यापासून या चौकशीला सुरूवात झाली होती. रात्री 8 वाजता ही चौकशी थांबवण्यात आली आहे.  ऑक्टोबर २०१८ मद्ये हे  प्रकरण उघडकीस आला होता. या प्रकरणी दोघांचेही म्हणणे त्यांनी नोंद करुन घेतली आहे.

नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओकॉन कंपनीला कर्ज देताना आयसीआयसीच्या माजी सीईओ चंदा कोचर  यांनी आपल्या पदाचा वापर केला

असा आरोप करत केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

चंदा कोचर यांनी 3520 कोटींचे कर्ज वाटपामध्ये  भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.

शनिवारपासून चंदा कोचर आणि दीपक कोचर यांची चौकशीला सुरूवात केली आहे.

प्रतिबंध कायदा (पीएमएलए) अंतर्गत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी चंदा कोचर आणि दीपक कोचर  यांच्यासहित धूत यांना ही नोटीस पाठवण्यात आली होती.

या प्रकरणामुळे या तिघांच्याही परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *