Sat. Feb 27th, 2021

ICSE Result 2019: मुंबईची जुही देशात पहिली

आयसीएसई बोर्डाचे इयत्ता १० वीचा, तसेच आयएसई १२ वी चे निकाल आज लागले आहेत. यावर्षी दहावीचा निकाल 98.54 एवढा लागला आहे. तर आयएई १२ वीचा निकाल 96.52 टक्के इतका लागला आहे. यावेळी आयसीएसई 10 वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते २५ मार्चमध्ये झाली आहे. तर, आयसीएसई 12 वीची परीक्षा 4 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. आज 10 वी आणि 12वीचे निकाल लावण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईच्या जुही कजारियाने चांगलीच बाजी मारली आहे. यंदाच्या निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.

मुंबईची जुही देशात पहिली..

आयसीएसई बोर्डाचा इयत्ता १० वीचा, तसेच आयएसई १२ वीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

यावर्षी दहावीचा निकाल 98.54 एवढा लागला आहे. तर आयएई १२ वीचा निकाल 96.52 टक्के इतका लागला आहे.

आयसीएईत मुंबईची जुही कजारिया इयत्ता दहावीच्या परीक्षेत देशात पहिली आली आहे. तिला ९९. ६० टक्के गुण मिळाले आहेत.

मुंबईच्या जमनाबाई नर्सी शाळेत ही जुही रुपेश कजारिया शिक्षण घेत आहे.

मनहर बन्सल या विद्यार्थीनींनी ९९.६० टक्के गुण मिळवीत दहावीत पहिला क्रमांक मिळवला आहे.

अनुश्री चौधरी, अनुष्का अग्निहोत्री आणि ठाण्याचा यश भन्साळी यांनी ९९.४० टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *