Sat. May 25th, 2019

हिंदूंच्या मुलींना स्पर्श करणारे हात उखडून फेका – अनंत कुमार हेगडे

0Shares

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

“जर कोणी हिंदू मुलीला स्पर्श केला, तर त्याचे हात मुळापासून उखडून फेका”, असे विधान केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले आहे.

कर्नाटकातल्या कोडागूमध्ये एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

केंद्रीय मंत्री रॅलीला संबोधित करताना म्हणाले, जो हिंदूंच्या मुलींना स्पर्श करेल, त्याचे हात तोडून टाका, इतिहास अशाच प्रकारे लिहिला जातो आणि जेव्हा तुम्ही इतिहास लिहाल तेव्हा तुमच्यात एक प्रकारची हिंमत येते.

तुम्ही इतिहास वाचल्यास भीती निर्माण होते. आता आपणच ठरवावे तुम्हाला इतिहास लिहायचा की वाचायचाय ?, जातीसंदर्भात विचार न करता आजूबाजूच्या परिस्थितीचा आपण विचार केला पाहिजे, असेही अनंत कुमार हेगडे यांनी म्हटले आहे.

तसेच ताजमहाल हे मुस्लिमांनी तयार केलेले नाही. शाहजहाँने ताजमहाल हा राजा जय सिंह यांच्याकडून विकत घेतला होता. ताजमहाल एक शिव मंदिर आहे, ज्याचे निर्माण राजा परमतीर्थ यांनी केले होतं.

ताजमहालचे पहिले नाव तेजो महालय होते. नंतर त्याचे ताजमहाल असे नामकरण करण्यात आले. तसेच हेगडे यांनी टीपू जयंतीवरही टीका केली.

ब्रिटिशांच्या काळात 4 युद्ध लढणारा टीपू सुलतान हा बलात्कारी होता. टीपू जयंतीच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे हेगडेंनी स्पष्ट केले आहे.

जे लोक स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि बुद्धिजीवी समजतात, त्यांची स्वतःची अशी कोणतीही ओळख नसते. असेही अनंत कुमार हेगडे म्हणाले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *