Wed. May 22nd, 2019

‘इम्रान खान इतकेच उदार’ तर मसूदला भारताकडे सोपवावं – सुषमा स्वराज

58Shares

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यावर पाकिस्तानने दिलेल्या प्रतिक्रियेवर पराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सवाल उपस्थित केला आहे. ‘पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान इतकेच उदार आहेत तर मग त्यांनी मसूद अजहरला आमच्याकडे सोपवावं’, अशी मागणी पराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे.

‘भारतीय जग: मोदी सरकारचं परराष्ट्र धोरण’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांना पाठिशी घालणं बंद करावं आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी नाहीतर दोन्ही देशांतील संबंध अधिक बिघडू शकतात असा इशारा सुषमा स्वराज यांनी दिला आहे.

काय म्हणाल्या सुषमा स्वराज ?

‘पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान इतकेच उदार आहेत तर मग त्यांनी मसूद अजहरला आमच्याकडे सोपवावं.

‘पाकिस्तानी लष्कर जैश-ए-मोहम्मदच्या वतीने आमच्यावर हल्ला का करत आहे?असा सवाल त्यांनी केला आहे.

‘तुम्ही जैश-ए-मोहम्मदला आपल्या जमिनीवर फक्त आश्रय देत नाही तर त्यांना पैसेही पुरवत.

जेव्हा पीडित देश याचं उत्तर देतो तेव्हा तुम्ही त्यांच्या वतीने हल्ला करता.असा आरोप त्यांनी केला आहे.

‘जोपर्यंत पाकिस्तान आपल्या जमिनीवर आश्रय दिलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली जाणार नाही’

‘भारत-पाकमधील संबंधात वारंवार अडथळा निर्माण करणाऱ्या आयएसआय आणि लष्करावर पाकिस्तानने नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

‘आम्ही दहशतवादावर चर्चा करणार नाही तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा.दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही.असं ही त्या म्हणाल्या आहेत.

पाकिस्तानने त्यांच्या जमिनीवर आश्रय मिळालेल्या दहशतवादी संघनटनांवर कारवाई केली तर दोन्ही देशांमधील संबंध सुधारु शकतात असं ही त्या म्हणाल्या.

पाकिस्तानने त्यांच्या जमिनीवर आश्रय घेतलेल्या दहशतवादी संघनटनांवर कारवाई केली.तर दोन्ही देशांमधील संबंध सुधारु शकतात असं ही त्यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *