भारताबरोबर युद्ध झाले तर पाकचाच पराभव – इम्रान खान

भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच तणावाचे वातावरण असताना पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणवस्र हल्ल्याबाबत भाष्य केेले आहे. त्याचबरोबर पाकिस्तान आणि भारतामध्ये पारंपारिक युद्ध झाले तर पाकिस्तानचा पराभव होईल असे इम्रान खान म्हणाले आहे. तसेच या पारंपारिक युद्धाचे परिणाम चांगले नसतील असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
काय म्हणाले इम्रान खान ?
काश्मीर मुद्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे.
त्यातच पाकच्या पंतप्रधानांनी भारताला अणवस्र हल्ला करण्याची धमकी दिली.
मात्र धमकी दिल्यानंतर या पारंपरिक युद्धात पाकिस्तानचा पराभव होणार असेही म्हणाले.
युद्धात पराभवावेळी फक्त दोन पर्याय असतात एक म्हणजे आत्मसमर्पण नाही तर शेवटच्या क्षणापर्यंत स्वातंत्र्यासाठी लढत राहवे.
त्यामुळे पाकिस्तान शेवटच्या क्षणापर्यंत लढणार असल्याने परिणाम भयावह असतील म्हणून संयुक्त राष्ट्राला संपर्क केल्याचे म्हटलं.
संयुक्त राष्ट्राने आता तरी पावलं उचलावी असे म्हटलं आहे.
पाकिस्तान कधीही अणुुयुद्धाची सुरुवात करणार नाही.
मी शांतताप्रिय व्यक्ती असून मी युद्धाच्या विरोधात असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
युद्धाने समस्या सुटणार नसून त्याचे परिणाम वाईट आहेत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.