Jaimaharashtra news

आमच्या नेत्यांचा अनादर केल्यास चोख प्रत्युत्तर मिळेल – अशोक चव्हाण

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बीडमध्ये बुधवारी इंदिरा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. यावरुन आता चांगलचं राजकारण तापलं आहे.

मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करत या प्रकरणासंदर्भात काँग्रेसची बाजू मांडली आहे.

काय म्हणाले अशोक चव्हाण ?

देशाची एकता आणि अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्‍या इंदिरा गांधी आजही जगभरात कणखरता आणि कर्तबगारीसाठी ओळखल्या जातात.

जितेंद्र आव्हाडांनी वेळेच या बद्दल खुलासा केला, ते बरंच झालं असं मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान आमच्या नेत्यांचा अनादर करणाऱ्यांना चोख प्रत्युतर दिले जाईल, असा स्पष्ट इशाराच अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

नक्की प्रकरण काय ?

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी बीडमध्ये संविधान बचाव रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असं वादग्रस्त विधान आव्हाडांनी केलं होतं. यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी चांगलीच टीकेची झोड उठवली.

काँग्रेस प्रवक्ता डॉ. राजू वाघमारे यांनी या व्यक्तव्याबाबत आव्हाडांकडे खुलासा मागणार असल्याचे जय महाराष्ट्रशी बोलताना म्हणाले होते.

यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्वविटरवर एक व्हिडिओ शेअर करुन आपली भूमिका मांडली.

अधिक वाचा : इंदिरा गांधीनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता – जितेंद्र आव्हाड

वादग्रस्त विधानानंतर जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण

Exit mobile version